Ad will apear here
Next
राष्ट्रीय रूरबन मिशनअंतर्गत कासटवाडीची निवड
जव्हार (पालघर) : केंद्र शासन पुरस्कृत श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन अभियानच्या अंमलबजावणीसाठी जव्हार तालुक्यातील ‘कासटवाडी’ समूहाची निवड करण्यात आली आहे.
 
आदिवासी भागातील गावसमूहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे, शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे हा या अभियानाचा मुख्य उदेश आहे. या योजनेंतर्गत ‘कासटवाडी’ पर्यटनस्थळ म्हणून  विकसित केले जाणार असून विविध शासकीय योजना येथे प्राधान्याने राबविण्यात येणार आहेत.

या समूहांतर्गत कासटवाडी, जुनी जव्हार, डेंगाची मेट व आमरे या चार ग्रामपंचायतीतील १४ महसूल गावे व २५ पाड्यांचा समावेश आहे. शासकीय अनुदानातून विविध पायाभूत आणि जीवनोत्तीबाबत विविध प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZREBF
Similar Posts
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक पालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला
राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी उत्पादनवाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याबद्दल, डहाणू तालुक्यातील नरपड गावचे देवेंद्र राऊत व वडदे गावचे बाळकृष्ण पऱ्हाड या दोन शेतकऱ्यांना सर्वसाधारण गटातील ‘वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी
‘उघड्यावर शौचास प्रतिबंध’ डिजिटल व्हॅनचे उद्घाटन पालघर : ‘जिल्ह्याची हागणदारीमुक्तीकडे सुरू असलेली वाटचाल गतिमान होऊन सर्वत्र स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी कार्यरत राहू. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून पालघर जिल्हा परिषदेचे कामकाज पारदर्शकरित्या करण्यात येईल,’ असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले
पालघर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिन साजरा पालघर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर प्रसंगी स्वच्छता आणि संकल्पातून सिद्धीकडे नवभारत चळवळ २०१७ ते २०२२ ची प्रतिज्ञा घेण्यात आली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language